आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: आमिर-शाहरुखच्या सुरक्षेत कपात, बॉलिवूडमधील 25 जणांची सुरक्षा काढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरूख, अमिर खान (फाईल फोटो) - Divya Marathi
शाहरूख, अमिर खान (फाईल फोटो)
मुंबई- बॉलिवुडमधील 40 सेलिब्रिटीजना असलेल्या सुरक्षा कवचेत मुंबई पोलिसांनी बदल केला आहे. यात सहिष्णूतेवर वक्तव्य देऊन वादात अडकलेल्या आमिर खान व शाहरुख खानचा समावेश आहे. तर 25 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. फक्त अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांची सुरक्षा आहे तशीच कायम ठेवण्यात आली आहे.
आमिर-शाहरुखच्या सुरक्षेत आता किती सुरक्षारक्षक असतील...या दोघांनी काय दिले वक्तव्य...
- अमिर व शाहरूला सध्या एस्कॉर्ट व्हेईकल आणि चार आर्म्ड कॉन्स्टेबल मिळत होते. आता फक्त दोन आर्म्ड कॉन्स्टेबल मिळतील.

- शाहरुख आणि आमिर यांनी नोव्हेंबर महिन्यात इन्टॉलरन्सबाबत वक्तव्य दिले होते.

- शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले होते की, 'देशात इन्टॉलरन्स वाढत चालला आहे. जर मला सांगितले गेले तर मी प्रतिकात्मक निषेध म्हणून मी मला मिळालेला पुरस्कार परत करेन.
- दुसरीकडे आमिरने एका कार्यक्रमात म्हटले होते की, 'देशातील वातावरण पाहता पत्नी किरणने धक्कादायक वक्तव्य केले होते. तिने मला विचारले होते की, काय आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण भारत देश सोडून जायचे काय?
अमिताभ, दिलीप कुमार आणि लता यांना कशी आणि किती असेल सुरक्षा?
- या तिघांकडे एक पर्सनल आर्म्ड कॉन्स्टेबल राहील. एक एस्कॉर्ट व्हेईकल असेल. यात चार आर्मड कॉन्स्टेबल आणि एक सिक्युरिटी इन्चार्ज राहील.
- ही सुरक्षा व्यवस्था त्यांना कायम ठेवण्यात आली आहे.
- अक्षय कुमार, महेश भट्ट, मुकेश भट्ट यांची सुरक्षा आहे तशी कायम राहील.
- अक्षयला खंडणी आणि वसूलीसाठी गॅंगस्टर्सकडून आणि भट्ट ब्रदर्सना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी दिली गेली आहे.
अजून काय आहेत बदल...
- सिक्युरिटी ऑडिटमध्ये आढळून आले की, किमान 25 बॉलिवुड सेलिब्रेटीज यांना पुरविण्यात आलेली सुरक्षा वाया जात आहे.
- त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली.
- यात विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, फराह खान, करीम मोरानी, अली मोरानी आदींचा समावेश आहे.
- करीम आणि अली मोरानी यांच्या घरावर 2014 मध्ये गॅंगस्टर्सनी फायरिंग केली होती.
पुढे स्लाईडमध्ये पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...