आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

500, 1000 च्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन देणारा मुंबईचा पोलिस अधिकारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तीन कोटी रुपयांचा काळा पैसा बदलून देण्याचे एका बिल्डरला आश्वासन दिल्याने साहायक पोलिस निरिक्षक संजय माळी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. अशाच स्वरुपाचे आश्वासन देणाऱ्या 20 पोलिस अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात येत आहे.
यासंदर्भात मुंबई पोलिस विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांनी सांगितले, की आम्ही विभागांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय माळी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तोपर्यंत त्यांना कामातून निलंबित करण्यात आले आहे.
यापूर्वी देवेन भारती यांनी पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या, की कुणालाही 1000 किंवा 500 च्या जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन देऊ नका. तसेच यासाठी पोलिसांच्या खबऱ्यांचाही वापर करु नका.
पुढील स्लाईडवर बघा, संजय माळी यांचे फोटो.... यांना काळापैसा बदलण्यासाठी करण्यात आले आहे निलंबित....
बातम्या आणखी आहेत...