आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी यांची अखेर बदली, राजकारण तापले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे-वरळी सी-लिंकवर आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडवणारे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी यांची बदली सांगलीतील पोलिस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सुर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात काही आमदारांनी मारहाण केल्यानंतर प्रचंड राजकीय उलथापालथ झाली होती.

सचिन सुर्यवंशी यांना बदलीचा आदेश मिळाला आहे. नियमांनुसार सुर्यवंशी यांना येत्या २४ तासांत पोलिस प्रशिक्षण केंद्रात रुजू व्हावे लागेल. परंतु, सी-लिंकवर झालेल्या वादावादी प्रकरणी दिलासा मिळत नाही तोपर्यंत बदलीच्या ठिकाणी जाणार नाही, अशी कडक भूमिका सुर्यवंशी यांनी घेतली आहे. त्यामुळे बदलीवरूनही राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असताना सचिन सुर्यवंशी यांनी सी-लिंकवर आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडविली होती. ठाकूर यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले होते. परंतु, आमदार असल्याचे सांगून ठाकूर यांनी सुर्यवंशी यांच्याशी वाद घातला होता. त्यानंतर सुर्यवंशी यांना विधिमंडळात बोलविण्यात आले होते. त्यावेळी काही आमदारांनी त्यांनाा बेदम मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटले होते. राजकीय नेते विरुद्ध पोलिस प्रशासन असा रंग त्याला चढला होता. त्यामुळे मारहाणीवर नाराजी व्यक्त करीत काही आमदारांना काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते.