आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Police Trying To Bring Kasab And Jundal Face To Face

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसाब आणि जबिची आमने-सामने चौकशी करण्‍याचे मुंबई पोलिसांचे प्रयत्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अजमल कसाबची चौकशी करण्‍यास मुंबई गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांना राज्‍य सरकारने परवानगी दिली आहे. याप्रकरणात अटकेत असलेला अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारी याचा ताबा सध्‍या गुन्‍हे शाखेकडे आहे. दोघांना समोरासमोर नेऊन चौकशी करण्‍याची तयारी पोलिसांनी केली आहे. परंतु, अद्याप त्‍यास परवानगी दिलेली नाही.
दोघांची एकत्र चौकशी करण्‍यासाठी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप पोलिसांना काहीही उत्तर मिळाले नाही. मुंबईवर हल्ला होण्याआधी अतिरेकी डेव्हिड हेडली आणि इतर आपण भेटल्याचे जबीने मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले आहे. डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे जबी खरे सांगत आहे की नाही हे तपासण्यासाठी मुंबई पोलिस या दोघांना समोरासमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कसाबने जुंदलचे छायाचित्रही ओळखले आहे.
ज्यावेळी 26/11 रोजी अतिरेकी मुंबईवर हल्ला करत होते. त्यावेळी लष्कर-ए तोयबाच्या पाकिस्तानातील कराची येथील केलेल्या कंटङ्खोल रुममध्ये मी तिथेच होतो असे जबीने चौकशीदरम्यान सांगितले आहे. तसेच मुंबईतील छाबाड हाऊस या प्रार्थनास्थळामध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी बोलत असल्याचे जबीने पोलिसांना सांगितले आहे.
दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय बॉम्‍बस्‍फोटातील प्रमुख आरोपी चकमकीत ठार
राजधानी दिल्‍ली \'लष्‍कर\'च्‍या निशाण्‍यावर
26/11 च्या चार महिने अगोदरच कसाबला हिंदी शिकविली
पाकिस्तानी ISIच्या मेजरने पुरविली होती कसाबला एके-47 ची काडतुसे