आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Policemen Thrash Muslim Youths, Tell Them To 'go In Pakistan'

मुस्लिम युवकाला मारहाण करून पाकिस्तानात जाण्याची मुंबई पोलिसांची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वांद्रे पोलिसांवर एका मुस्लीम तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यातील काही पोलिस अधिका-यांनी आपल्याला मारहाण केली. तसेच धमकी देऊन पाकिस्तानला जायला सांगितले असल्याचा गंभीर आरोप त्या तरुणाने केला आहे. आसिफ असे या मुस्लिम तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एक मोबाईल व्हिडीओ हाती लागला आहे. ज्यात आसिफ आपल्यावर कसा अत्याचार झाला हे सांगत आहे.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर समाजवादी पक्षासह एमआयएमच्या नेत्यांनी संबंधित पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आसिफला वांद्रे पोलिसांनी एका खोट्या प्रकरणात अटक केली. तसेच त्याला बेदम मारहाण करीत त्याला पाकिस्तानला निघून जा अशी धमकीही दिली.