आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai: Pradeep Sharma Acquitted In Lakhan Bhaiya Encounter Case

लखनभैय्या एन्काउंटर: प्रदीप शर्मांची निर्दोष सुटका, 13 पोलिसांवर हत्येचा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सन 2006 मध्ये झालेल्या लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई जिल्हा कोर्टाने पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका केली. मात्र, 13 पोलिसांना कोर्टाने दोषी ठरवले. त्यांच्यावर हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आज (शुक्रवारी) मुंबई जिल्हा कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

रामनारायण ऊर्फ लखनभैय्या गुप्ता याचा 11 नोव्हेंबर 2006 रोजी एन्काउंटर झाला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा, प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह तेरा पोलिस अधिकार्‍यांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता. कोर्टाने या प्रकरणी न‍िकाल देताना प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र 21 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यात प्रदीप सूर्यवंशींसह अन्य तेरा पोलिस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

दरम्यान, 11 नोव्हेंबर 2006 रोजी संध्याकाळी अंधेरीतील नाना नानी पार्कजवळ लखनभैया नामक गुंडाचा एन्काउंटर केला होता. लखनभैय्या या गुंडाचा वर्सोवा येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचा दावाही डी.एन. नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी केला होता. परंतु, या घटनेच्या दुसर्‍या दिवशी लखनभैय्या याचा भाऊ अ‍ॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते, की त्याच्या भावाचा एन्काउंटर झाला नसून पोलिसांनी त्याची हत्या केली होती. लखनभैयाचे आधी नवी मुंबईतून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुंबईत आणून त्याची हत्या करण्यात आली होती. रामप्रसाद गुप्ता यांनी फॅक्स आणि तार दाखवला, तो त्यांनी 11 नोव्हेंबर 2006 रोजी दुपारी पोलिस आयुक्तांना पाठवला होता. चौकशीत पोलिसांचे पितळ उघडे पडले होते. मुंबई हायकोर्टाने पोलिस उपअधिक्षकांच्या नेतृत्त्वाखाली विशेष चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते.

15 नोव्हेंबर रोजी रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात डी.एन.नगर ठाण्यातील पोलिसांविरुद्ध याचिका दाखल केली होती. लखनभैया याची हत्या करण्यात आलेल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता.

दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2008 मध्ये हायकोर्टाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. लखनभैया याची हत्या केल्याचे त्यात स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे ही अत्या नियोजनबद्धरित्या करण्‍यात आल्याचेही अहवालात म्हटले होते. त्यानंतर हायकोर्टाने सप्टेंबर 2009 मध्ये एक विशेष चौकशी समितीची स्थापना करण्‍याचे आदेश दिले होते.

याप्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप शर्मा यांच्यासह 21 जणांना आठ जानेवारी 2010 रोजी अटक करण्‍यात आले होते.