आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai: Prime Minister Narendra Modi Inaugurates New Building Complex Of The Bombay Art Society

PM IN MUMBAI: कलेवर बंधनं नको, ती तर समाजाची खरी ताकद- मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी बांद्रा-कुर्ला स्थित \'द बॉम्बे ऑर्ट सोसायटी\'च्या वास्तूचे उद्घाटन झाले. - Divya Marathi
छायाचित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी बांद्रा-कुर्ला स्थित \'द बॉम्बे ऑर्ट सोसायटी\'च्या वास्तूचे उद्घाटन झाले.
मुंबई- मुंबईतील 127 वर्षाची परंपरा लाभलेल्या 'द बॉम्बे ऑर्ट सोसायटी'च्या वास्तूचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी झाले. बांद्रा-कुर्ला स्थित येथे हे कॉम्पलेक्स बांधण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. उद्धव व राज ठाकरे या बंधूंनी अपेक्षेप्रमाणे या कार्यक्रमाला दांडी मारली आहे.
काय म्हणाले मोदी?
- कला आधी माणसाच्या ह्दयात निर्माण होते, नंतर ती मनात येते व त्यानंतर ती कॅनव्हॉस उतरते-मोदी
- कलेला वय नते, जात नाही, धर्म नाही तसेच तिला कशाचेही बंधन नाही अगदी वेळेचेही- मोदी
- या सोसायटीवर तीन शतकांचा प्रभाव आहे. हाच संदेश व हीच ताकद येथे दिसून येत आहे.
- कला, संस्कृती ही तर आपल्या समाजाची ताकद, शक्ती आहे- मोदी
- कलेवर कोणतेही बंधने असू नयेत, कला एक संवेदनाची अभिव्यक्ती असते-मोदी
- कला प्रत्येक माणसातील आतील आवाजाला जिवंत ठेवते- मोदी
- कलेला राज्या-राज्यांनी पुरस्कृत केले पाहिजे- मोदी
- शरद पवारांचे खास अभिनंदन, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कलाकारांच्या सोसायटीसाठी जागा दिली- मोदी
- पुढच्या पिढीसाठी आपली कला, संस्कृती डिझीटल माध्यमातून जतन करून ठेवली पाहिजे- मोदी
शरद पवार काय म्हणाले?
- मुंबईत कलाकारांची खाण आहे. मुंबईला कलाकारांचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळेच देशभरातून मुंबईत कलाकार येतात व मुंबईला समृद्ध करतात- पवार
- कला नेहमीच आपल्याला समृद्ध करते. मानवी जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
काय म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस?
- मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, आमच्या महाराष्ट्राची राजधानी आहे तशीच देशाच्या कला, साहित्य, संस्कृती, सिनेमा, थिएटर आदींचीही राजधानी आहे.
- कला आणि साहित्य या दोन गोष्टीबाबत महाराष्ट्राची खास ओळख आहे व त्याला येथे विशेष स्थान आहे.
पुढेे पाहा, द बॉम्बे ऑर्ट सोसायटी कॉम्पलेक्सच्या सोहळ्याची क्षणचित्रे....