आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डोंगर कापून बनवला आहे मार्ग, जाताना टनेलसह लागतात दोन हिल स्टेशन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र आपल्या विकासाचे पुढील टप्पे गाठताना दिसतो. अर्थव्यवस्था असो की पायाभूत सुविधांच्या बाबतीत असो महाराष्ट्राने देशाच्या उर्वरित राज्याअगोदर मोठी मजल नेहमीच मारत आला आहे. नवे व्यवसाय, पार्क, पायाभूत विकासाचे प्रोजेक्ट्सपासून औद्योगिक विकासातही मोठी झेप घेतली आहे. बांधकाम क्षेत्रातही मुंबई-पुणे-नाशिकसारख्या शहरात मोठी तेजी आहे. त्यामुळे या शहरात पायाभूत सुविधा दर्जेदार असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाबद्दल सांगणार जो देशातील सर्वात पहिला व कमी खर्चात बांधला गेला आहे. या द्रुतगती मार्गाला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे असे नाव देण्यात आला आहे. देशातील सर्वात चांगल्या मार्गापैकी हा एक आहे.
मुंबई-पुणे दरम्यान बनला आहे हा हायवे- भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि आयटी सिटी म्हणून ओळखले जाणा-या पुणे या दोन शहरादरम्यान हा हायवे बांधण्यात आला आहे. याच कारणामुळे त्याला मुंबई-पुणे हायवे असे नाव दिले आहे. भारतातील हा पहिला सिक्स लेन हायवे आहे. ज्यावर लोणावाळा आणि खंडाळा ही दोन हिलस्टेशन लागतात.

हाय-वे आहेत अनेक टनेल- हा हाय वे 'सहयाद्री पर्वत'मधून काढण्यात आला आहे. ज्यामुळे मुंबई ते पुणे या दरम्यान अनेक टनेल लागतात. हे सर्व टनेल पर्वत कापून रस्ता बनविल्याने तयार झाले आहेत. या टनेलचे हे वैशिष्टये आहे की, यात लावले गेलेले सर्व दिवे व एग्झॉस्ट फॅन वायू आणि सोलर लाईटवर चालतात.

93 किमी लांब आहे हायवे- मुंबई-पुणे हाय वे 93 किलोमीटर लांब आहे. हाय वे मुंबईजवळील पनवेलच्या कळंबोलीपासून सुरु होतो आणि पुण्याजवळील देहू क्षेत्र येथे समाप्त होतो. यादरम्यान, शेदुंग चौक, खालापुर, लोणावाला, कुसगाव आणि तळेगाव टोलनाके येतात.

1990 मध्ये सुरु झाला होता प्रोजेक्ट- मुंबई- पुणे एक्सप्रेस हाय वेचा प्रोजेक्ट 1990 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरु केला होता जो 2002 मध्ये पूर्ण झाला. हायवे प्रोजेक्टचे नाव प्रथम मुंबई-पुणे हाय वे होते. मात्र, काँग्रेस सरकारने त्याचे नाव बदलून यशवंतराव चव्हाण हायवे असे ठेवले. असे असले तरी आज मुंबई-पुणे हायवे म्हणूनच प्रसिद्ध आहे.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा मुंबई- पुणे हायवे चे PHOTOS...