आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्‍हा अपघात, वाहतूक ठप्‍प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातामुळे जाम झालेली ट्रफ‍िक - Divya Marathi
अपघातामुळे जाम झालेली ट्रफ‍िक
पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. येथे आज (शनिवार) सकाळी 10:30 वाजताच्‍या सुमारास कामशेत बोगद्यामध्‍ये दोन ट्रकची समोरासामोर धडक झाली. यातील दोन्‍ही चालक गंभीर जखमी झालेत. तर, दोन्‍हीकडील वाहतूक ठप्‍प झाली आहे. दरम्‍यान, महामार्ग पोलिस अपघातग्रस्‍त ट्रक बाजूला करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.