आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, पूर्व-पश्चिम उपनगरातही जोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील पावसाबाबतचा व्हिडिओ येथे पाहा.... - Divya Marathi
मुंबईतील पावसाबाबतचा व्हिडिओ येथे पाहा....
मुंबई- मुंबईत गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसात सरासरी 500 मिलीमीटर इतका तुफान पाऊस पडल्यानंतर शनिवारी पहाटे ते दुपारपर्यंत पावसाने थोडीशी उसंत घेतली. मात्र, दुपारनंतर पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस पडू लागला आहे. दादर, परळ, हिंदमाता परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वेसेवा सुरु झाली आहे. हॉर्बर, मध्य व पश्चिम अशा तीनही मार्गावर लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. दरम्यान, हवामान खात्याने आगामी 24 तासात मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस कोसळेल अशी भीती व्यक्त केली. याचबरोबर मुंबईला हायटाईडचा मोठा धोका आहे.
गुरुवारी रात्री मुंबईत घुसलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर बेधुंद आणि बेफाम मारा करून मुंबईकरांना गृहकैदेतच ठेवले. पावसाच्या या अतिरेकी हल्ल्यामुळे मुंबापुरीचे जनजीवन ठप्प झाले. पंधरा दिवसांचा पाऊस एका दिवसात कोसळला. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणार्‍या तिन्ही मार्गांवरील लोकलची चाके पाण्यात रुतली. रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाले तर सखल भागातील अनेक रस्ते बुडाले. पावसाने मुंबईची दाणादाण उडवली आणि ‘26 जुलै’च्या महाप्रलयाच्या आठवणीने मुंबईकरांचा थरकाप उडाला.
गुरुवारी रात्री संततधार सुरू झाली आणि शुक्रवारी सकाळी त्याचे परिणाम दिसले. मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, पश्‍चिम रेल्वेची अंधेरी ते चर्चगेट आणि वाशीपर्यंतची हार्बर सेवा हे तिन्ही मार्ग पावसाने ठप्प केले होते. एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड येथे रुळांवर पाणी साचल्याने पश्‍चिम रेल्वेला ब्रेक लागला. चाकरमान्यांना सकाळी साडेसहाच्या सुमारासच हा जबर झटका बसला. पाऊस थांबत नव्हता आणि मुंबईतील पाणी फुगत होते. रेल्वे स्थानकांवर गाडीची वाट पाहून कंटाळलेले चाकरमानी पुन्हा घरी परतले. जे कार्यालयात पोहचले त्यांनीही पुन्हा लवकरच परतीची वाट धरली. मंत्रालयासहा सर्व सरकारी कार्यालये, शेअर बाजार, खासगी कंपन्यांची कार्यालये शुक्रवारी ओस पडली होती. पावसाने मुंबईकरांची अशी पार दाणादाण उडवली.
पावसामुळे मुंबईत शुक्रवारी विविध ठिकाणी 71 झाडे कोसळली. दादरच्या कीर्ती महाविद्यालयाजवळही एक झाड कोसळले. तर मुंबईत 12 ठिकाणी घरे आणि भिंतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यात एकजण जखमी झाला आहे. मुंबईत शॉर्टसर्किटच्या 22 घटना घडल्या. वडाळा जे.के. बशीर मार्ग इमारत क्रमांक 11मध्ये रणजीतकुमार गुप्ता (60) आणि गौरव धामीर कर्णिक (5) यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.
हायटाईडचा आजही धोका-
शुक्रवारी एकीकडे अखंड कोसळणारा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता तर दुसरीकडे दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे मुंबईतील ‘पाणीसाठ्या’त अधिकच वाढ झाली. समुद्रात 4.47 मीटरच्या उंच लाटा उसळल्या. पाऊस आणि भरती अशा कात्रीत मुंबई सापडली. शनिवारच्या मध्यरात्री 2.29 समुद्रात 3.82 मीटरच्या लाटा उसळल्या. आज (शनिवारी) दुपारी दुपारी 3.10 वाजता पुन्हा 4.33 मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याने समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
पुढे पाहा, सध्याची मुंबईतील स्थिती कशी आहे....
बातम्या आणखी आहेत...