आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Rape City Not A Safe City Says Devendra Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई सेफ नव्हे, रेप सिटी : देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई ही सेफ सिटी नाही, तर रेप सिटी झाली आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘छायाचित्रकार तरुणीवर बलात्काराची घटना ही लांच्छनास्पद आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचेच यावरून दिसून येते. मुंबईला सेफ सिटी बनवण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले होते. तुम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळू शकत नसाल, तर त्वरित पदावरून दुर व्हायला हवे, असे फडणवीस यांनी ट्विट केले.