आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा : डॉक्टरर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन अशी सज्ज झालीय मुंबई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
मुंबई- मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई सज्ज झाली असून दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शीव (सायन) ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. डबेवालेही या मोर्चात सहभागी होणार आहेत.
 
सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने पोलिस या सगळ्यावर लक्ष ठेवणार आहेत. सुमारे 7 हजार पोलिस यासाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने यासाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पिण्याच्या पाण्याचीही सर्वत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 7 ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स, 8 ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, 6 ठिकाणी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...