आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदल भरतीत चेंगराचेंगरी; अनेक तरुण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालाड येथील मार्वेच्या समुद्रकिनारी असलेल्या ‘आयएनएस हमला’ या ठिकाणी नौदलाच्या भरतीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेक तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या परीक्षेसाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. मात्र, प्रवेशद्वारासमोर प्रचंड गर्दी झाल्यामुळे तरुणांत चेंगराचेंगरी झाली.

वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी नौदलाने भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार भरती प्रक्रियेसाठी मालाडमधील ‘आयएनएस हमला’ या नौदलाच्या एकमेव परीक्षा केंद्रात सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांतून सहा हजार तरुण आले होते. परीक्षेसाठी आलेल्या तरुणांसाठी जेवणाचीही व्यवस्था नव्हती. दरम्यान, या ठिकाणी जखमी तरुणांच्या चपलांचा खच साचला होता.
बातम्या आणखी आहेत...