आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात प्रथमच ड्रोनद्वारे झाली पिझ्झा डिलेव्हरी, कंपनीनेच तयार केला व्हिडीओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात प्रथमच मानवविरहीत ड्रोनद्वारेस पिझ्झा डिलेव्हरी करून इतिहास रचण्यात आला. मुंबईतील फ्रान्सेस्कोज पिझ्झा आऊटलेटने ड्रोनद्वारे या पिझ्झाची डिलेव्हरी केली.
फ्रान्सेस्कोज पिझेरियाचे सीईओ मिखेर रजनी यांनी याबाबत सांगतिले की, 'आतापर्यंत आपण ई-कॉमर्समधील मोठे नाव असणा-या अमेझॉनच्या ड्रोन्सबाबत ऐकले होते. ते अमेरिकेमध्ये हवाई मार्गाने विविध वस्तुंची डिलेव्हरी करतात. त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या आऊ़टलेटपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणा-या एका ग्राहकाला ड्रोनच्या मदतीने पिझ्झा डिलेव्हरी दिली.' ही केवळ चाचणी होती. पुढच्या काही वर्षांमध्ये या पद्धतीचा नियमित वापर सुरू होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

रजनी यांनी दिलेल्या माहितीनुसार चार रोटर असणा-या या ड्रोनने मुंबईतून उड्डाण घेतले आणि वरळी परिसरातील उंच इमारतींमधून प्रवास करत हा पिझ्झा डिलिव्हर केला. देशात प्रथमच ड्रोनच्या मदतीने पिझ्झा डिलिव्हरी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षापासून या व्यवसायामध्ये असणा-या या आऊटलेटने या पिझ्झा डिलेव्हरीचा व्हिडीओही तयार केला आहे. एका ऑटो इंजिनिअरने हे उड्डाण यशस्वी केले. या पद्धतीमुळे कंपनीचा वेळ आणि पैसाही वाचू शकतो. कारण कंपनीला सध्या दुचाकींद्वारे डिलेव्हरी करणा-या एजंटची मदत घ्यावी लागते.

अशा प्रत्येक कस्टमाइझ्ड ड्रोनसाठी सुमारे 2,000 यूएस डॉलरचा खर्च येतो. सध्या ड्रोनच्या वापरावर अनेक कारणांमुळे बंदी आहे. तसेच ड्रोनला 400 फुटांपेक्षा अधिक उंचीवर उडवण्याची परवानगीही नाही. अनेक तांत्रिक अडचणीही आहेत. याची क्षमता 8 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची आहे, त्यानंतर याची बॅटरी संपते. पण चार्जिंग स्टेशनच्या मदतीने ही समस्या सोडवली जाऊ शकते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा व्हिडीओ...