आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० लाखांच्या फ्लॅटमध्ये राहतोय श्रीमंत भिकारी, दरमहा कमाई तब्बल ७५ हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही श्रीमंत, अतिश्रीमंतांची नगरी आहे. याच नगरीत देशातील सर्वात श्रीमंत गरीब भिकारी राहतो, असे सांगितले तर त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. मुंबईतील भारत जैन नावाचा एक भिकारी आहे. पण त्याच्याकडील संपत्ती पाहिली तर अनेक श्रीमंतदेखील त्याच्यापुढे गरीब ठरतील.

भरत जैनकडे ८० लाखांचा एक मध्य वस्तीत फ्लॅट असून त्याची दरमहा कमाई सुमारे ७५,००० इतकी आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मालकीचे भांडूप येथे एक दुकानदेखील आहे. अशी संपत्ती असूनही तो नियमितरीत्या भीक मागण्याचे काम करतो. त्याने त्याच्या मालकीचे दुकान किरायाने दिले असून त्याचे दरमहा १० हजार रुपये भाडेदेखील तो वसूल करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. पैकी एक १२ वी, तर दुसरा दहावीत शिकतो. त्यांना चांगले शिक्षण देण्याचे भारत जैनचे स्वप्न आहे. ता त्याचे वडील व भावासह ८० लाखांच्या एक वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतो.

या ठिकाणी मागतो ८-१० तास भीक

भारत जैन छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदान परिसरात नियमितपणे भीक मागण्याचे काम करतो. तो ८-१० तास भीक मागतो व २००० ते २५०० रुपये जमवतो. त्याची दरमहिन्याची कमाई जवळपास ७५,००० रुपये इतकी असून ती देशातील कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त आहे.