आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात श्रीमंत गणपतीला चढवणार 20 कोटींचे सूवर्ण अलंकार, 265 कोटींचा इन्श्युरन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विद्या, बुद्धी अन् कलेची देवता श्री गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी (दि. 25) होणार आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत प्रतिष्ठापनेचा अत्यंत शुभमुहूर्त आहे.

गणेशोत्सवानिमित्त आम्ही आपल्यासाठी देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ अर्थात जीएसबी (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळाची रोचक माहिती घेऊन आलो आहे. यंदा मंडळाने गणपती मूर्ती आणि सभामंडपाचा 264.25 कोटी रुपयांचा इन्श्युरन्स उतरवला आहे. गेल्या वर्षी ही इन्श्युरन्सची रक्कम 234 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे यंदा जीएसबीच्या बप्पाच्या अंगावर 20 कोटी रुपये किमतीचे सूवर्ण अलंकार चढवले जाणार आहेत.

स्थापनेपासून विसर्जनापर्यंत इन्श्युरन्स...
- जीएसबी सेवा मंडळाचे सदस्य आर.जी. भट्ट यांनी दिलेली माहिती अशी की, इन्श्युरन्स स्थापनेपासून विसर्जनापर्यंत असेल.
- यात दहशतवादी हल्ला, जातीय दंगल, पुरस्थितीमुळे होणारे नुकसान या इन्श्युरन्समध्ये कव्हर असेल.
- जीएसबी गणेश मंडळतर्फे 5 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. 52.85 कोटी रुपये प्रतिदिन इन्श्युरन्स आहे.

यंदा 20 कोटींचे सूवर्ण अलंकार...
- गणरायाला यंदा सुमारे 20 कोटी रुपयांचे  सोने, चांदी, हीरे आणि किमती रत्नाचे अलंकार चढवण्यात येणार आहेत‍. दागिन्यांची सुरक्षा आणि निगरानीसाठी जवळपास 77 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
-गणरायाची मूर्ती 14 फूट उंच व देखणी असते.

गणपती बाप्पासोबत भक्तांचाही इन्श्युरन्स
- गणपती बाप्पासोबत भक्तांचाही 20 कोटी रुपयांचा इन्श्युरन्स उतरवण्यात आला आहे.
- या इन्श्युरन्समध्ये गणेशोत्सवादरम्यान दिला जाणार प्रसाद, फळ, भाज्या आणि व्हॉलेंटियर्स कव्हर असेल.
- प्रत्येक व्हॉलेंटियर्सचा 10 लाख रुपयांचा इन्श्युरन्स असेल.

500 हून जास्त सिक्यूरिटी गार्ड
- गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाची सुरुवात 1951 मध्ये झाली होती. पाच दिवसांचा हा गणेशोत्सव असतो. सुमारे 20 लाखांहून जास्त भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
- गणपतीला प्रत्येक दिवशी लाखो रुपयांचे दान मिळते. गणपतीच्या सुरक्षिततेसाठी 500 हून जास्त खासगी सुरक्षारक्षक 24 तास तैनात असतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...