आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरी मार्ग पर्यायाला तज्ज्ञांचा हिरवा कंदील, अंदाजे खर्च १० हजार कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सागरी किनारी मार्गाच्या पर्यायाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अनुकूलता दर्शवत अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला. या समितीचे अध्यक्ष व मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केले.
या समितीने अहवालात या प्रस्तावित किनारी मार्गाची लांबी 35.60 कि.मी. असेल, असे म्हटले आहे. रस्त्याच्या काही भागात पूल, बोगदा स्टिल्टवरील बांधकाम, उड्डाण पूल आणि काही ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले रस्ते यांचा समावेश असणार आहे. तसेच समुद्रात भराव टाकून कृत्रिम जमीन तयार करावी लागणार असून केंद्रीय पर्यावरण आणि वने खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. तसेच काही जमीन ही सार्वजनिक उद्याने किंवा हरितपट्टा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाच्या उभारणीचा आराखडा तयार करताना समुद्र किना-याच्या सौंदर्यीकरणाचा आणि सागरीदृश्यात अडथळा येणार नाही याचा काटेकोर विचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
हा प्रस्तावित सागरी मार्ग सागरी पर्यावरण, कांदळवने यांच्या अस्तित्वाला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आखण्यात आला असल्याचे सुबोधकुमार यांनी सादरीकरणाच्या दरम्यान सांगितले.