आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त, सात अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | दादर येथील हिंदू कॉलनी भागातून एका इनोव्हा कारमधून ८५ लाख रुपयांच्या नवीन नोटा पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या. दरम्यान, याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
एक कोटी रुपयांची रोकड घेऊन ही कार या भागातून जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
नोटाबंदीच्या काळातही इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मुंबईमध्ये प्रथमच अशा प्रकारची मोठी कारवाई झाली आहे.
मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.
बातम्या आणखी आहेत...