आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेतील शोले राज्यात आणखी भडकले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्ताधारी भाजप-शिवसेनेमधील वादाचे शाेले चांगलेच भडकले असून परस्परांच्या नेत्यांची तुलना शोले चित्रपटातील पात्रांशी करण्याची जणू चढाओढ लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपने शोले सिनेमातील असरानी म्हटल्याने शिवसेनेत प्रचंड खळबळ माजली. भाजपच्या मंडळींना युतीचे सरकार बुडवण्याची दुर्बद्धी सुचली आहे, असा पलटवार करताना शिवसेनेकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शोलेतील खलनायक गब्बरसिंग संबोधण्यात आले. गब्बरची जी स्थिती झाली होती तीच शहांची होईल, अशी टीका शिवसेनेने केली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, सेनेच्या पक्षप्रमुखांना असरानी म्हणणाऱ्या भंडारी यांनी पक्षात त्यांची काय लायकी आहे, हे तपासून घ्यावे. गब्बर ज्या डाकूला विचारतो “कितने आदमी थे’, तो सांबा म्हणजेच भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी असल्याची टीका सेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका व प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने भाजपची तुलना अफझलखानची फौज अशी केली होती. शहांना थेट अफझलखान म्हटल्याने भाजप संतापला होता. २०१४ आॅक्टोबरपासून सुरू झालेला भाजप-शिवसेनेमधील कलगीतुरा आजही कायम असून सेनेने सत्तेमधील आपल्या मोठ्या भावावर टीकेचे आसूड मारण्याची एकही संधी सोडलेली नाही. भाजप हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची बोचरी टीका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केल्याने फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

सेनेचे आंदोलन, गब्बर-सांभाच्या पुतळ्याचे दहन
उद्धव ठाकरेंरवरील टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून याला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या गिरगाव शाखेने क्रांतीनगर येथे आंदोलन केले. यावेळी भाजपमधील गब्बरसिंह व सांभा यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

पुढे वाचा, भंडारींमुळे पडली काडी...
बातम्या आणखी आहेत...