आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील दुकाने गजबजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) गेले सहा दिवस किरकोळ दुकानदारांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. त्यामुळे रविवारी दुकाने उघडताच मुंबईकरांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती.

22 एप्रिलपासून मुंबईतील 20 हजार ठोक व्यापारी संपावर आहेत, तर 6 मे पासून किरकोळ दुकानदारांनी या आंदोलनात उडी घेतली होती. मुंबईतील 1 लाख 20 हजार किरकोळ दुकानदार बंदमध्ये सहभागी होते. त्यामुळे नागरिकांची दैनंदिन वस्तूसाठी अडचण होत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी दादर भागातील दुकाने उघडण्यास किरकोळ व्यापार्‍यांना भाग पाडले. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या व्यापार्‍यांच्या संघटनेने बंदमधून माघार घेत असल्याचे शनिवारी जाहीर केले होते, त्यामुळे रविवारी व्यापार्‍यांनी दुकाने उघडली. रविवार सुटी व सोमवारी अक्षय्य तृतीया आल्याने दादर, काळबादेवी, भायखळा, परळ भागातील कपड्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती.

आंदोलनाचे नेतृत्व ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ करत आहे. या संघटनेमध्ये आणि किरकोळ व्यापार्‍यांची संघटना ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ संघटनेत बंदवरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्याचे पर्यवसान दुकाने उघडण्यात झाले. ‘फाम’मात्र बंदवर ठाम आहे.