आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलफिन्स्टन: चेंगराचेंगरीत तरुणीला तुडवत होते लोक; हिलोनीला वडीलही ओळखू शकले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील फुट ओव्हर ब्रिजवर शुक्रवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यात चार्टर्ड अकाऊंटन्ट हिलोनी देढिया (25) हिचा समावेश आहे. आगीच्या अफवेनंतर ब्रिजवर लोकांनी एकच धावपळ केली. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही लोक ब्रिजच्या पायर्‍यावरून खाली पडले तर काही लोक ब्रिजच्या रेलिंगमध्ये अडकलेले दिसले. हिलोनीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. तिला तिचे वहिलही ओळखू शकले नाही.

6 महिन्यांपूर्वी बॅंकेत सुरु केला होता जॉब...
- मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवरील सुरक्षा विभागाने दुर्घटनेतील मृतांच्या नावाची यादी जाहीर केली. यादीत 13व्या क्रमांकावर हिलोनी देढिया हिचे नाव आहे.
- हिलोनी, सहा महिन्यांपूर्वी एक्सिस बॅंकमध्ये नोकरीवर रुजू झाली होती.
- दररोज 10.30 वाजता ती एलफिन्स्टन स्टेशनवर उतरत होती.
-  परंतु शुक्रवार हा तिच्यासाठी अंतिम दिवस ठरला.

पर्स आणि मोबाइल स्टेशनवर सापडला....
- दरम्‍यान, दुर्घटनेनंतर हिलोनीची पर्स आणि मोबाइल स्टेशन प्लॅटफॉर्मवर बेवारस अवस्थेत सापडला. परंतु हिलोनी सापडली नाही.
- KEM हॉस्पिटलच्या स्टाफला हिलोनीच्या वडिलांनी मोबाइलवर फोटो दाखवला.
-  15 मृतदेह पाहूनही हिलोनीला वडिलांना ओळखता आले नाही.
- हिलोनीचा चेहरा काळा कुट्ट पडला होता.
- हिलोनीच्या कपड्यांवरून तिची ओळख पटली.
- मुलीचा मृतदेह पाहून तिचे आई-वडील धायमोकलून रडू लागले.
-वडील निलेश देढिया यांनी सांगितले की, 'हिलोनी ही आमची एकूलती एक मुलगी होती. तिच्या अकाली निधनाने आम्ही सर्वकाही गमावले आहे.'

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...