Home | Maharashtra | Mumbai | Mumbai thane kalyan rain

मुंबईत पावसाला परत सुरूवात; सखल भागात पाणी साचले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 15, 2017, 02:50 PM IST

मुंबईत पावसाला परत सुरूवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

 • Mumbai thane kalyan rain
  मुंबईसह कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
  मुंबई/ठाणे- मुंबईत पावसाला परत सुरूवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. संततधार पावसाने मोडकसागर धरण भरले आहे. धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्याने वैतरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला आहे आणि यामुळे कल्याण-टिटवाळा शहराशी १५ गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,
  आंबिवली, फळेगावसह नजीकच्या १५ गावांचा संर्पक तुटला आहे. ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.
  मुंबईसह कोकणातली स्थिती
  दक्षिण मुंबईसह कांदिवली, अंधेरी, दहिसर, बोरिवली या पश्चिम उपनगरांत तर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपरसह अनेक पूर्व उपनगरात ठिकठिकाणी पाऊस सुरु आहे. उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस पडू शकतो.

 • Mumbai thane kalyan rain
  अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 • Mumbai thane kalyan rain
  नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Trending