आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai & Thane\'s All 10 Mp Meet To Rail Minister At Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीच्या दहाही खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, लक्ष घालण्याचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नरेंद्र मोदींच्या सरकारने मागील चार दिवसापूर्वी अचानक सुमारे 14.5 टक्के रेल्वे भाडेवाढ करून सर्वसामान्यांना चांगलाच दणका दिला आहे. याविरोधात मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. याचीच दखल घेऊन मुंबई व ठाणे परिसरातील सर्व दहाही खासदार रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या भेटीला गेले. सकाळी 10 वाजता ही भेट झाली. मुंबईकरांची हाक आमच्या कानावर पडली आहे व यात लवकरच लक्ष घालू असे आश्वासन गौडा यांनी दिली. याबाबत सांगितले जात आहे की, लागलीच निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. 8 जुलै रोजी रेल्वेचे बजेट सादर केले जाणार आहे. त्यावेळी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
या खासदारांच्या शिष्टमंडळात मुंबईतील केंद्रीय पियूष गोयल, खासदार रामदास आठवले, आमदार आशिष शेलार, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आदी हजर होते. रेल भवनमध्ये सकाळी दहा वाजता या सर्व नेत्यांनी गौडा यांची भेट घेतली व मुंबईकरांच्या रेल्वेभाडेवाढीबाबत तीव्र भावना असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत मंथली रेल्वे पासच्या किंमतीत दोन ते अडीचपट वाढ झाली आहे. जी खूपच अनाठायी असल्याचे म्हणणे नागरिकांचे आहे. नागरिकांच्या भावना महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ लक्ष घातले.
महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. लोकसभेवेळी राज्यातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला याचा मुंबई व ठाणे पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो याची जाणीव होताच शिवसेनेने ही भाववाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. त्यानंतर प्रदेश भाजपने भाडेवाढीचे आधी समर्थन केल्यानंतर मागे येत मुंबई उपनगरीय भाडेवाढ कमी करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह हे रविवारी गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेसाठी मुंबईत आले होते. त्यावेळीही महायुतीने मुंबईतील रेल्वेभाडेवाढीबाबत माहिती दिली होती.
आज मुंबईतील सर्व 10 खासदारांचे शिष्टमंडळ भेटीला गेले आहे. त्यांच्यासोबत केंद्रीयमंत्री पीयूष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार यांची उपस्थिती आहे. तसेच या निर्णायाचा आगामी विधानसभा निवडणुकीत कसा फटका बसू शकतो याची माहिती दिली. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले मात्र भाडेवाढ मागे घेण्याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत.
छायाचित्र- रविवारी मुंबईत आलेले पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना रेल्वे भाडेवाढीबाबतची माहिती देताना विनोद तावडे...
पुढे वाचा, विधानसभेच्या यशासाठी भाजपची धावाधाव....