आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई वाहतूक विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? ट्राफिक पोलिसांचे Rate Card हायकोर्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई वाहतूक पोलिस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्राफिक पोलिसांनी 'रेटकार्ड' ठरलेले असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी हायकोर्टात केला आहे.

अॅड. दत्ता माने यांनी टोके यांची जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. मुंबई वाहतूक विभागात प्रचंड भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांची चौकशीची मागणी टोके यांनी केली आहे.

भ्रष्टाचारात मदत करण्यास नकार दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचेही टोके यांनी कोर्टात सांगितले आहे. पुरावा म्हणून टोके यांनी एक व्हिडिओ कोर्टात सादर केला आहे.  

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करुनही भ्रष्ट अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई न  झाल्याने टोके यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या याचिकेवर 23 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी हायकोर्टात केलेले गौप्यस्फोट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...