आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: 'अल्को बूथ'मुळे टल्ली तळीरामांची आता BAR बाहेरच होणार नाकाबंदी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दारूच्या नशेत तर्रर्र होऊन सुसाट गाड्या चालविणा-या तळीरामांना रोखण्यासाठी व हिट अॅंड रनसारख्या घटना टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दारू घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती वाहन चालवण्याच्या स्थितीत आहे किंवा नाही आणि नसेल तर त्याला रोखण्यासाठी मुंबई पोलिस आता प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बूथ लावणार आहेत. या अल्को बूथ मशिनमुळे एखादी व्यक्ती किती दारू प्याली आहे ते लागलीच कळणार आहे. त्यामुळे बारच्या बाहेरच तळीरामांची नाकाबंदी होणार आहे. या योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतूक करीत योजनेला पाठिंबा दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिस, परिवहन विभाग व पालिकेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा मुहूर्त साधून या योजनेचे उद्घाटन फडणवीस यांनी केले.
काय आहे योजना व कशासाठी केली सुरु?
- दारू पिऊन कार, गाड्या चालविल्यामुळे राज्यात दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात.
- दारू जास्त पिऊन गाडी चालवल्याने हिट अ‍ॅंड रन सारख्या घटना घडतात व त्यात निष्पांपाचे नाहक बळी जातात. अनेक गंभीर जखमी होतात.
- सलमान खान, जान्हवी गडकर आदी प्रकरणातून हाच धडा मिळाला.
- भविष्यात अशा घटना रोखायच्या असतील तर यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय
- मुंबईतील प्रसिद्ध व प्रमुख बारच्या बाहेर तळीरामांना रोखण्यासाठी अल्को बूथ ही मोहीम राबविण्याचा निर्णय
- अल्को बूथ मशिनमुळे संबंधित व्यक्तीने किती दारू घेतली आहे हे लगेच समजणार
- प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्यास त्याला गाडी चालविण्यापासून रोखणार
- या टल्ली लोकांना घरी सोडण्यासाठी टॅक्सीचा वापर केला जाणार आहे. या अल्को बूथलाच टॅक्सी सर्व्हिसेसच्या मोबाईल नंबरची यादी जोडलेली असणार आहे.
- 500 वॉर्डन अल्को बूथ तपासणीच्या मोहिमेवर आजपासून रूजू होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...