आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक सिग्नल झाले स्मार्ट; संख्या पाहून कालावधी बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबापुरी म्हणजे वाहनांच्या लांबलचक रांगा आणि चौकाचौकात रोड ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांची लगबग. यावर आता महापालिकेने नामी उतारा शोधला असून शहरातील वर्दळीच्या चौकातील वाहतूक सिग्नलला वाहन शोधक कॅमेऱ्याची जोड दिली आहे.

या स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे मुंबईतील सिग्नलचा कालावधी ट्रॅफिकनुसार कमी, अधिक होणार असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होऊन वायूप्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

मुंबई शहरात एकूण ५९० सिग्नल आहेत. त्यातील वर्दळीच्या ठिकाणचे २५५ सिग्नल स्मार्ट पद्धतीचे करण्यात आले आहेत. म्हणजे या सिग्नलना वाहनशोधक कॅमेऱ्याची जोड दिली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील ट्रॅफिक वाढताच येथील हिरवा सिग्नलचा कालावधी वाढेल तर ट्रॅफिक कमी होताच सिग्नलाचा कालावधीही आपोआप कमी होईल.
या सिग्नलला सीसीटीव्ही जोडले आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीचे प्राप्त चित्रण आणि तेथील संगणकीय माहितीनुसार सदर सिग्नल मानवीय पद्धतीने देखील नियंत्रीत केले जाऊ शकणार आहेत. अशा प्रकारे स्मार्ट वाहतूक सिग्नलची मुहूर्तमेढ रोवणारी मुंबई देशातील पहिली महापालिका ठरली आहे. स्मार्ट वाहतूक सिग्नल पद्धतीचा नियंत्रण कक्ष वरळीच्या पोलिस मुख्यालयात असून सॅटेलाईट माहिती नियंत्रण कक्ष महापालिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी संकुलात लावण्यात आला आहे. शहरातील उर्वरित सर्व सिग्नलही लवकरच स्मार्ट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

काय होणार बदल
>सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चौकातील प्राप्त चित्र दिसणार असून रुग्णवाहिका किंवा इतर आवश्यक कारणामुंळे त्या ठिकाणच्या सिग्नलाचा कालावधी नियंत्रण कक्षातून बदलणे शक्य होणार.
> वाहन शोधक कॅमेरे असल्यामुळे त्या मार्गावरील वाहन संख्येची नोंद होते. त्याचे संगणकीय पद्धतीने व संबंधित सॉफ्टवेअरच्या मदतीने विश्लेषण केले जाते. आणि त्यानुसार वाहतूक सिग्नलचा कालावधी बदलतो.
> सध्याची सिग्नल यंत्रणा : पारंपरिक सिग्नल ३३५, सतत बंद-चालू होणारे १६६, स्मार्ट सिग्नल २५५, वाहन शोधक कॅमेरे ६८३, सीसीटीव्ही कॅमेरेयुक्त सिग्नल २४ आहेत.
बातम्या आणखी आहेत...