मुंबई - मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटाचा खटला अखेर अंतिम निकालापर्यंत येऊन ठेपला असून गुरुवारी विशेष मोक्का न्यायालय या खटल्याचा अंतिम निकाल सुनावणार आहे. गेली नऊ वर्षे विशेष मोक्का न्यायालयात हा खटला चालला असून या बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या तब्बल १८८ जणांचे तसेच आठशेपेक्षा अधिक जखमींचे कुटंुबीय अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावर ११ जुलै २००६ रोजी रेल्वेत बॉम्बस्फोट झाले होते. २३ एप्रिल २०१० राेजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. या खटल्यादरम्यान विशेष न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १९२ साक्षीदार, बचाव पक्षातर्फे ५२ साक्षीदार तर एक न्यायालयीन अशा एकूण २४५ जणांचे जबाब नोंदवले गेले होते. १८ ऑगस्ट २०१४ रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून येत्या गुरूवारपासून खटल्याचाअंतिम निकाल सुनावण्यात येणार आहे.