आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील वृक्षतोडीची झाडाझडती होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विकासकामांचे प्रकल्प राबवताना तोडण्यात येणा-या वृक्षांच्या मोबदल्यात वृक्ष पुनर्रोपण मात्र होत नसल्याने महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी गेल्या सहा महिन्यांचा वृक्षतोडीचा अहवाल मागितल्याने पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईत विकासकामांचे प्रकल्प राबवताना अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याची परवानागी पालिका देत असते. त्यासाठी पालिकेत वृक्ष प्राधिकरण समिती असून आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात. समितीसमोर वृक्षतोडीचे प्रस्ताव आल्यानंतर अधिका-यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून वृक्षतोडीचा निर्णय घेतला जातो. समितीमध्ये मतभेद झाल्यास समिती सदस्य संयुक्त पाहणी करून निर्णय देतात. गोरगाव येथील किंग्स्टन पॉपर्टी या विकासकाने 481 वृक्षतोडीची परवागनी नुकतीच मागितली होती. या विकासकाने पूर्वी 181 वृक्ष तोडले आहेत. त्याच्या बदल्यात एकाही वृक्षाचे पुनर्रोपण केले नाही. त्यामुळे त्यास पुन्हा वृक्षतोडीची परवानगी देऊ नये, अशी मागणी मनसे, भाजपने केली होती; परंतु आयुक्तांनी या विकासकाची 481 वृक्षतोडीची मागणी मंजूर केल्याने भाजप व मनसेने सभात्याग केला होता.