आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देशमुख सक्तीच्या रजेवर; दयानंद शिंदे यांच्याकडे कार्य़भार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई- मुंबई िवद्यापीठाला विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लावण्यात यंदा खूपच उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या वादंगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख आजपासून रजेवर गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राज्यपाल व कुलपती चे. विद्यासागर राव यांच्याकडे रजेचा अर्ज केला होता. राज्यपालांनी देशमुख यांची बुधवारी मंजूर केली आहे.
 
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होईपर्यंत पटेल यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात मुंबई विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र यातील अनेक परीक्षांचे निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची जबाबदारी पटेल यांच्या खांद्यावर असणार आहे.
 
विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल 90 दिवसांनंतरही जाहीर करण्यात आलेले नाहीत. राज भवनात झालेल्या बैठकीनंतर या पदासाठी पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगणक अभियंता असलेल्या पटेल यांच्या अनुभवामुळे प्रलंबित निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे. कुलगुरू देशमुखांनी राज्यपालांकडे रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसारच ते रजेवर गेल्याचं बोललं जातंय. मात्र त्यांना राजभवनाकडूनच सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...