आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठात अारटीअाय अभ्यासक्रम, तीन महिन्यांचा कालावधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशासकीयकामकाजात पारदर्शकता अाणण्यासाठी केंद्र सरकारने पारित केलेला माहिती अधिकार कायद्यावर (अारटीअाय) अाधारित तीन महिन्यांचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू केला जात अाहे. किमान १२ वी उत्तीर्ण अशी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अट असून ताे मराठी इंग्रजी या दाेन्ही भाषांमधून शिकवला जाणार अाहे.
पारदर्शी कारभारासाठी ‘अारटीअाय’चे अस्त्र सध्या सर्वांसाठीच उपयाेग ठरत अाहे. मात्र अाजही अनेक लाेक असे अाहेत ज्यांना अापल्या या अधिकाराबाबत जाणीवजागृती झालेली नाही. अशा लाेकांसाठी किंवा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना उपयाेगी पडेल असा तीन महिने किंवा ७२ तास मुदतीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठात सुरू हाेत असल्याची माहिती विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख सुरेंद्र जाेंधळे यांनी दिली. १२ अाॅक्टाेबर राेजी देशात ‘अारटीअाय’चा कायदा संमत झाला. त्यामुळे या दिवसापर्यंत पहिली बॅच पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी केंद्रीय माहिती अायुक्त शैलेश गांधी, माहिती अधिकार मंचचे भास्कर प्रभू माहिती अधिकार क्षेत्रातील अभ्यासक व्यंकटेश नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार केला अाहे.

अाणखी काही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना ‘अारटीअाय’चे प्रशिक्षणही विद्यापीठातर्फे दिले जाणार अाहे.