आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी श्रीमंत!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या लोकसंख्येपैकी 50-70 टक्के लोक गरीब असल्याचे सांगण्यात येते. मात्र, देशामध्ये मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असावे ज्याच्या 6.5 लाख विद्यार्थ्यांचे उत्पन्न सरासरीपेक्षा अधिक आहे.
2011-12 या वर्षांच्या विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये 50 लाख रुपयांची तरतूद गरीब विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाने त्यातील एक रुपयाही खर्च केला नसल्याने विद्यापीठामध्ये सर्वच श्रीमंत विद्यार्थी आहेत, असेच म्हणायची वेळ आली आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 25 लाखांचा निधी आरक्षित आहे. विद्यापीठाच्या 5 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे आदिवासीबहुल असतानाही यातील एकाही गरजू विद्यार्थ्यावर पैसा खर्च करण्यात आला नाही, असे व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने समितीच्या बैठकीनंतर सांगितले. याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाला मदतीसाठी एकही मागासवर्गीय विद्यार्थी सापडू शकला नाही, हे उघड झाले आहे. याशिवाय कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यापीठ प्रशासनाने 5 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी राखून ठेवला होता. मात्र, विद्यापीठाकडून त्यावर काहीच खर्च झालेला नाही.

लाखोंचा निधी पडून
2011-12 चा अर्थसंकल्प
वर्ग तरतूद खर्च
अनुसूचित जाती 25 लाख 0
मागासवर्गीय 20 लाख 0
गरीब विद्यार्थी 5 लाख 0