मुंबई- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नुकतेच नियुक्त झालेले डाॅ. संजय देशमुख यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह राज्यातील शिक्षणतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या अाहेत.
अापल्या भेटीचे देशमुख यांनी समर्थन केले असले, तरी या चर्चेबाबतची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. पत्रकारांशी बाेलताना डाॅ. देशमुख म्हणाले, ‘ही राजकीय भेट नव्हतीच. कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यानंतर मी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांच्या भेटी घेऊन त्यांची विद्यापीठाविषयी मते जाणून घेत अाहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मी भेट
घेणार अाहे.’