आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Violence Bjp Gives Award For Violencer Serach

दंगेखोरांना पकड़ून दिल्यास भाजपतर्फे लाखाचे इनाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दंगलीत अमरज्योतीचे नुकसान करणार्‍या आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनांवर पेट्रोल ओतून आग लावणार्‍या दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या दोघांना पकडून देणार्‍या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे पारितोषिक भाजपच्या वतीने दिले जाईल, अशी घोषणाही पुरोहित यांनी केली.
आझाद मैदानावर झालेल्या हल्ल्यात काही अपप्रवृत्तींसह बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याने या घुसखोरांना मुंबईतून हाकलावे, हल्लेखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने 18 ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात लॉँगमार्चचे आयोजन केल्याची माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धोबी तलाव ते अमरज्योतीपर्यंत काढण्यात येणार्‍या लाँगमार्चला पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच, असा दावा पुरोहित यांनी केला आहे. 11 ऑगस्ट रोजी रझा अकादमीच्या आंदोलनानंतर झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. या आंदोलनात केवळ असामाजिक तत्त्वच नव्हे तर बांगलादेशी घुसखोर मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले असल्याचा आरोप पुरोहित यांनी केला. मुंबईत सात लाख बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. त्यांची मतदारयादीतील नावे काढून टाकावीत, त्यांच्या शिधापत्रिका रद्द करून त्यांना परत पाठवण्यात यावे. काही नेते दंगलखोरांना पाठीशी घालत असून यात नसीम खान यांच्यासह आणखी एका मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी पुरोहित यांनी केली. रझा अकादमीच्या आंदोलनात चिथावणीखोर भाषणे करणार्‍यांना अद्याप अटक झाली नाही. हे पोलिस यंत्रणेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशींना 6 महिन्यांत परत न पाठवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.