आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे असू शकते वाय-फायचे दृश्य रूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई शहर खड्डेमुक्त होईल की नाही सांगता येणे कठीण असले, तरी या मायानगरीला वाय-फाय शहर करण्याचा इरादा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी बोलून दाखवला आहे. शहर वाय-फाय झाल्यानंतर कुठेही बसून तुम्हाला इंटरनेट वापरता येणार आहे. या वाय-फाय लहरी पाहाता येऊ शकतील का, असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर त्याचे उत्तर सापडले आहे.

वाय-फाय लहरी पाहता येऊ शकतात का?
होय, तर त्या कशा दिसतील? निकोल लॅम नावाच्या एका कलाकाराने या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी खगोल जीवविज्ञानतज्ज्ञ डॉ. एम ब्राउनिंग वोगल यांची मदत घेतली. डॉ. वोगल यांनी त्याला वायरलेस तंत्रज्ञानामागील विज्ञान छायाचित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितले. या माहितीचा उपयोग करून लॅमने वाय-फाय लहरींचे चित्र तयार केले. चला पाहूयात वाय- फाय लहरी कशा दिसतात?