आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या गळ्याला लावला होता चाकू, आईने असा वाचवला मुलाचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिलेने हॉकी स्टिकने लुटारूला झोडपून काढले. - Divya Marathi
या महिलेने हॉकी स्टिकने लुटारूला झोडपून काढले.
मुंबई- वसईत एका मुलाच्या गळ्याला चाकू लावत एक जण लुटमार करण्याचा प्रयत्न करत होता. पण या मुलाच्या आईने बहादुरीने या लुटारुचा मुकाबला करत त्यांना पळता भुई थोडी केली. इतकेच नाही तर तिने या लुटारुला पोलिसांच्या ताब्यातही दिले.
 
अशी घडली घटना
- माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईच्या पूर्व भागातील वसंत नगरीतील गुलमोहर सोसायटीत विजेंद्र कुमार यांच्या घरी ही घटना घडली. सायंकाळी 7 च्या सुमारास पूजा या आपल्या मुलासोबत घरात एकट्याच होत्या.
- त्याच वेळी एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरी आली आणि त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली. पूजाने दरवाजा खोलताच या व्यक्तीने चाकू दाखवत त्यांच्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले.
- पूजा यांनी याबाबत सांगितले की, त्या घरात काम करत होत्या. त्यावेळी दरवाजावरील बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर दारावर एक 25 ते 26 वर्षांचा युवक होता. त्याने विचारले की शिंदे आहेत का? मी नाही सांगितले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर त्या व्यक्तीने काही वेळाने पुन्हा बेल वाजवली. मी दरवाजा खोलातच त्याने चाकूचे टोक माझ्या मुलाच्या कपाळावर ठेवत त्याला ताब्यात घेतले.
- त्यानंतर मुलाला घेऊन तो आत गेला. मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत तो म्हणाला की, गप्प बसा नाहीतर मी तुम्हा दोघांनाही मारुन टाकेल.
- त्यानंतर त्याने पुजाला एका बॅगेत सगळ्या किमती वस्तू, दागिने आणि पैसे भरण्यास सांगितले.  
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती 
बातम्या आणखी आहेत...