आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Youth Congress To Distribute \'Pankaja Chikki\' As Protest Against Chikki Scam, CST Station Footpath,

मुंबई: काँग्रेसकडून पंकजा चिक्कीचे वाटप, उद्धव वाटणार 400 विद्यार्थ्यांना टॅब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिक्की घोटाळ्याचे सर्व आरोप महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी नाकारल्यानंतर व काँग्रेसने या घोटाळ्याबाबत सबळ पुरावे सादर करण्याची घोषणा केल्यानंतर ते न केल्यानंतरही मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील रेल्वेस्टेशनवर पंकजा मुंडे चिक्कीचे वाटप केले. तसेच पंकजा चिक्कीचे उत्पादन भारतीय जुमला पार्टीने तयार केल्याची टीकाही केली आहे.
उद्धव ठाकरेंकडून 400 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप-
शिवसेनेची सत्ता आल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात शिकणा-या 400 विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅब देण्यात येणार आहेत.
शिवसेनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची प्रक्रिया बालमोहन शाळेपासून सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आग्रही असायचे. शिवसेनाप्रमुखांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईलच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास करण्याची पर्वणीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. टॅबचा वापर कसा करावा, टॅब कसा हाताळावा याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी दाखविण्यात येणार आहे.