आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकर झाले ‘पुलं’कित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांचे निधन होऊन बारा वर्षे लोटली तरीदेखील आजही ते तमाम चाहत्यांच्या लक्षात आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात असा काहीसा अनुभव नुकताच मुंबईकरांनी घेतला.


पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या सर्वगुणसंपन्न अवलियाची माहिती नव्या पिढीला व्हावी यादृष्टीने पु. ल. देशपांडे अकादमीत त्यांच्या आठवणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुलंवर माहितीपट बनवणारे दिग्दर्शक जब्बार पटेल व सुधीर मोघे यांच्या गप्पांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. अवघ्या महाराष्ट्राला हसवणा-या पुलंच्या नुसत्या आठवणी ऐकून प्रेक्षकांना हसू आवरत नव्हते.


हास्यविनोदाने भारलेल्या गप्पांच्या कार्यक्रमानंतर त्यांनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट दाखवण्यात आला, तर दुसरीकडे पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘म्हैस’ या कथेवर आधरित ‘चांदी’ या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता रमेश आणि सीमा देव यांनी या चित्रपटाला आवर्जून हजेरी लावली.