आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आलिशान कार शो ' ला मुंबईकरांची गर्दी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मायानगरी’ असे बिरुद मिरवणा-या मुंबापुरीत रविवारी आलिशान कारचा शो आयोजित करण्यात आला होता. आपल्या स्वप्नातील कार रस्त्यावर पाहण्यासाठी युवावर्गासह तमाम मुंबईकरांनी गर्दी केली होती.
रेमंडचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया यांनी 2009 मध्ये या कार शोला सुरुवात केली. श्रीमंताकडे असलेल्या महागड्या गाड्या सर्वसामान्यांना पाहता याव्यात यासाठी या सुपर कार शोचे आयोजन सुरू करण्यात आले. फेरारी, मर्सिडीज, लम्बोर्गिनी, अ‍ॅस्टन मार्टिन, बेंटले, रोल्स रॉयस, पोर्श आणि बीएमडब्ल्यू गाड्या सहभागी झाल्या होत्या. प्रख्यात रेसर हानू मुकोला यांच्या हस्ते या दिमाखदार गाड्यांच्या शर्यतीला महालक्ष्मी रेसकोर्स येथून प्रारंभ झाला. महालक्ष्मी रेसकोर्स ते मरीन ड्राइव्ह आणि वांद्रे-वरळी सी लिंक ते विमानतळ असा प्रवास या आलिशान गाड्यांनी केला.

वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘ऑडी-आठ’ला आग
सकाळी ‘कार शो’च्या दरम्यान सर्व आलिशान गाड्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरून धावत होत्या. त्याच वेळी या रॅलीत सहभागी नसलेल्या एका ‘ऑडी आठ’ या धावत्या गाडीला अचानक आग लागली. हा प्रकार पाहताच सर्वांनीच गाड्या थांबवल्या आणि ऑडीची आग विझवून त्यात बसलेल्या चौघांनाही सुरक्षितरीत्या बाहेर काढले. सुपर कार शोचे आयोजक गौतम सिंघानिया यांनी सांगितले की, ज्या गाडीला आग लागली ती आमच्या कार शोमधील गाडी नव्हती.आमच्या टीमने दुर्घटनाग्रस्त गाडीतील लोकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.