आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणिकपणात मुंबईकरांचा जगात दुसरा क्रमांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन आणि इतर शहरांना धोबीपछाड देत देशाची आर्थिक राजधानी मुंबईने प्रामाणिकपणात जगात दुस-या स्थानी झेप घेत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. पहिल्या क्रमांकावर हेलसिंकी (फिनलंड) या शहराची निवड करण्यात आली. याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. त्यात ही माहिती जाहीर करण्यात आली. जगभरातील 16 देशांतील लोकांचे प्रामाणिकपणाबाबत मत जाणून घेण्यात आले. सर्व्हेनुसार 16 शहरांमध्ये एकूण 192 पर्स मॉल्स, सार्वजनिक स्थळांवर ठेवण्यात आल्या. यात 50 यूएस डॉलरसह मोबाइल आणि ज्या व्यक्तीची पर्स आहे, त्याची माहिती असलेले ओळखपत्र ठेवण्यात आले. 192 पैकी 90 पर्स या लोकांनी मूळ मालकांना परत दिल्या. यात हेलसिंकीमध्ये टाकण्यात आलेल्या 12 पैकी 11 जणांनी पर्स परत दिल्या, तर मुंबईत टाकण्यात आलेल्या 12 पैकी 9 जणांनी पर्स या मूळ मालकांना परत केल्या.