आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरणांवर आता ‘सीसीटीव्ही’ वॉच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळाच्या काळात पाण्याला सोन्यासारखी किंमत येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणातील पाण्याच्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलिस तैनात केल्याचे वृत्त होते. त्यापाठोपाठ आता मुंबईला पाणीपुरवठा करणारी सहा धरणे आणि आठ उदंचन केंद्रावर ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांची नजर ठेवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुंबईतील 121 कोटी लोकसंख्येला ठाणे जिल्ह्यातील तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, विहार या धरणांमधून पाणीपुरवठा होतो. पालिकेची धरणे आणि जलाशय यांना दहशतवादी कारवायांचा धोका आहे. त्यामुळे या जलाशयांना योग्य ती सुरक्षा पुरवावी, असे पोलिसांनी पालिकेस वारंवार कळवले आहे. मात्र, मनुष्यबळांमुळे पालिकेला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे शक्य झाले नाही. मात्र प्रशासनाने आता ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.