आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai's Farmer Mayor Shuba Raul Joins In Shivsena

शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत, तीन महिन्यात मनसेला टाटा करीत परतल्या स्वगृही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईच्या माजी महापौर व नगरसेविका शुभा राऊळ यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी मनसेला टाटा करीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या मनाने राऊळ यांना माफ करीत सेनेत प्रवेश केला.
शुभा राऊळ यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेना सोडत मनसेत प्रवेश केला होता व दहिसरचे शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत राऊळ यांच्यासह घोसाळकरांचा पराभव झाला व भाजपच्या नगरसेविका मनिषा चौधरी आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे अपयश आले. त्यामुळे निकालानंतर अनेक नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. आता तेथेही आपल्याला फारसे भवितव्य नसल्याचे लक्षात येताच राऊळ यांनी मनसेतून शिवसेनेत उडी मारली आहे. दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडतानाही उद्धव यांनी राऊळ यांच्याबाबत कोणतेही तीव्र प्रतिक्रिया दिली नव्हती तसेच आता प्रवेश करतानाही राऊळ यांच्याविषयी फारशी कटुता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शुभा राऊळ यांनी शिवसेना सोडताना केवळ घोसाळकरांना पाडण्यासाठी शिवसेनेतून मनसेत उडी मारल्याचे स्पष्ट होत आहे.
विनोद घोसाळकरांविरोधात अनेक महिला नगरसेविकांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महिला आयोग व पोलिसांतही मागील वर्षी तक्रार दिली होती. मात्र, घोसाळकर हे आमदार असल्याने त्यांच्याविरोधात फारसे कोणी गेले नाही. घोसाळकरांवर कारवाई करण्याची इच्छा असतानाही केवळ निवडणुका तोंडावर असल्याने उद्धव यांना जमले नव्हते. अखेर घोसाळकरांचा विधानसभेत पराभव झाल्याने उद्धव यांचा वैताग कमी झाला आहे. त्यामुळेच दहिसर भागात शुभा राऊळ यांच्यासह नाराज नेत्यांना सेनेत पुन्हा प्रवेश दिला आहे.