आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai's Former Deputy Mayor Ramesh Medhekar No More

मुंबईचे माजी उपमहापौर रमेश मेढेकर यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर रमेश मेढेकर (63) यांचे शुक्रवारी यकृताच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चारकोप येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेढेकर यांनी भाजपाच्या अखिल भारतीय मागासवर्गीय सेलचे महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचेही ते अध्यक्ष होते. रोहिदास पंचायत, डेक्कन मर्चंट्स बँक, सुश्रूषा हॉस्पिटल, संत रोहिदास चर्मकार कल्याण महामंडळ आदी माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कार्य केले.
ध्येयसमर्पित व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री
माजी उपमहापौर रमेश मेढेकर यांच्या निधनाने एक ध्येयसमर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मेढेकर यांनी प्रतिकूल काळात पक्षासाठी योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या सर्वसमावेशकतेच्या धोरणाचाही पक्षाला मोठाच लाभ झाला. अखिल भारतीय पातळीवर पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे महामंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रोहिदास पंचायत, डेक्कन मर्चंटस बँक, सुश्रूषा हॉस्पिटल, संत रोहिदास चर्मकार कल्याण महामंडळ आदी माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य केले. त्यांच्या निधनाने एक समर्पित आणि ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.