आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीतील निहालला झालाय दुर्मिळ आजार, 15 व्या वर्षीच दिसतोय 90 चा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 वर्षाचा भिवंडीतील निहाल बिटला प्राजोरिया या गंभीर आजाराने त्रस्त आहे. - Divya Marathi
15 वर्षाचा भिवंडीतील निहाल बिटला प्राजोरिया या गंभीर आजाराने त्रस्त आहे.
मुंबई- प्रोजेरिया आजाराने पीडित मुलांसाठी फंड जमा करण्यासाठी भिवंडीतील निहाल बिटलाने एक मोहिम सुरु केली आहे. निहालसुदधा याच आजाराने त्रस्त आहे. निहालचे वय आता 15 वर्ष इतके आहे मात्र तो 90 वर्षाचा असल्यासारखा दिसतो. निहालचे मित्र त्याला अमिताभ बच्चन यांची चर्चित फिल्म 'पा'मधील ऑरो समजतात व त्याच नावाने हाक मारतात. काय आहे निलाहची मोहिम...
- 'हॅट्स ऑन प्रोजेरिया' नावाच्या या विशेष मोहिमेद्वारे प्रोजेरिया रिसर्च फाउंडेशन (पीआरएफ), बोस्टन यासाठी फंड गोळा केला जातो.
- शुक्रवारी छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशनच्या बाहेर उभे राहून निहालने या रोगाबाबत लोकांत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
- त्याने लोकांना आव्हान केले की, या कामासाठी सढळ हाताने मदत करावी तसेच सोशल मिडियात याबाबतची छायाचित्रे टाकून ही माहिती लोकांपर्यंत पोहचवावी.
- निहालने सांगितले की, या आजाराबाबत लोकांच्या मनात चुकीच्या कल्पना आहेत. मला इतर लोकांच्या नजरेतून ते सहज दिसून येते. मात्र अनेक लोकांना हे का होते याची माहिती नाही.
-"मला वाटते की लोकांना या आजाराबाबत माहिती व्हावी आणि या आजाराने पीडित असलेल्या लोकांना मदत करावी.
निहालवर अमेरिकेत सुरु आहेत उपचार-
- निहालवर अमेरिकेतील बोस्टनमधील प्रोजेरिया रिसर्च फाउंडेशन (पीआरएफ) मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला औषधांवर ठेवलेले आहे.
- या वर्षी डिसेंबर महिन्यात तो आणखी एकदा उपचारासाठी बोस्टनला जाणार आहे.
- या आजारामुळे निहालची शाळा सुटली. निहालने सांगितले की, त्याला रोबोटिक सायन्समध्ये शिकायचे आहे.
- निहाल आपला बहुतेक वेळ पेंटिंग आणि इंटरनेटवर घालवतो.
'पा' चित्रपटाचा शेवट पसंत पडला नाही निहालला-

- काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चनचा आलेल्या 'पा' चित्रपटाने प्रोजोरिया आजाराबाबत खूप बोलले गेले.
- निहाल भारतातील प्रोजेरियाचा पहिली चर्चित केस आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, निहालच्या जीवनावरच आधारित 'पा' चित्रपट बनविला गेला.
- निहालचे मित्र त्याला ऑरो म्हणून बोलवतात.
- अमिताभ यांचा 'पा' मधील भूमिका निहालला खूप पसंत पडली. मात्र, चित्रपटात अमिताभ यांचा मृत्यू उपचार सुरु असताना होतो हे जे दाखवले ते निहालला पसंत पडले नाही.
- निहालला 'तारे जमीं पर' ही फिल्म खूपच आवडली होती. तो आमिर खानला भेटला आहे.
काय आहे प्रोजेरिया?

- प्रोजेरिया एक गंभीर अनुवांशिक आजार आहे. या आजाराने पीडित मुले इतर सामान्य मुलाच्या तुलनेत आठ पठीने वेगाने वाढतात.
- या आजाराने पीडित मुले सरासरी 14 वर्षे आयुष्य जगतात. या मुलाचा मृत्यू हद्यविकाराच्या आजाराने होतो.
- प्रोजेरियाच्या इतर लक्षणात शरीराची संपूर्ण वाढ न होणे, वजन कमी होत जाणे, केस गळणे, त्वचा म्हाता-या लोकांसारखी होणे, हिप डिस्लोकेशन, सांधे अकडणे आदी लक्षणे दिसतात.
- आज जगभरात अशी 300 मुले आहेत. ज्यांना प्रोजोरिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारतात नाही याच्यावर उपचार-

- भारतात या आजारावर कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे येथील डॉक्टरांनी निहालला बोस्टनला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
- निहालला प्रोजोरिया असल्याचे 6 वर्षानंतर समजले.
- निहालचे दात येताच गळून पडले. त्यामुळे तो चाऊन व्यवस्थित खावू शकत नाही.
पुढे पाहा, निहालशी संबंधित माहिती व त्याचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...