आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai\'s Ongoing Infra. Projects Presentation To Fadanvis From Officer

मुंबईत 1 लाख कोटींची कामे सुरु; अधिका-यांकडून फडणवीसांना कामांचे सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील जटिल वाहतूक समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रितीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शुक्रवारी मंत्रालयात फडणवीस यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु. पी. एस. मदान, सिडकोचे संजय भाटिया, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी नरिमन पॉईंट ते मालाड-कांदिवली या कोस्टल रोडविषयी सादरीकरण करण्यात आले. हा कोस्टल रोड पूर्ण झाल्यास नागरिकांना खूपच फायदा होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा खर्चही कमी असून किनाऱ्याची सुरक्षितताही जोपासली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सीआरझेड कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मेट्रोलाईन 3- या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी एमएमआरडीचे
मदान म्हणाले, एमएमआरडीए क्षेत्रामध्ये लोकसंख्येबरोबरच वाहतूकीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शिवडी ते चिरले हा ट्रान्स हार्बर लिंक अत्यंत उपयुक्त ठरेल. चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प आता चारकोपच्या पुढे दहिसर पर्यंत विस्तारित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. जवळपास 16 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. मेट्रो 3 हा कुलाबा ते वांद्रे असा हा पूर्णत: भुयारी मार्ग असलेला प्रकल्प असणार आहे. 32.5 कि.मी. लांबीच्या या प्रकल्पामध्ये 27 स्टेशन्स असणार आहेत. तसेच जवळपास 14 लाख नागरिकांना याद्वारे प्रवाशाचा लाभ घेता येणार आहे. नरिमन पॉईंट, कफ परेड, काळबादेवी तसेच विमानतळे अशी ठिकाणीही या प्रकल्पाची स्टेशने असून वाहतूक खेाळंबा, प्रदूषण रोखणे, वेळ वाचविणे यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
राज्यातील प्रलंबित पायाभूत प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नरिमन पॉईंट ते मालाड-कांदिवली या कोस्टल रोडविषयी एमएमआरडीएमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाईन-2 व चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प आता मेट्रो 3 हा कुलाबा ते वांद्रे असा हा पूर्णत: भुयारी मार्ग असलेला
एम.एस.आर.डी.सी. द्वारे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प (प्रवासी व रो.रो.सेवा) फेरी व्हार्फ (भाऊचा धक्का) ते नेरुळ व मांडवा याबरोबरच पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी जलवाहतूक प्रकल्प (नरिमन पॉईंट-वांद्रे-जुहू-मार्वे- वर्सोवा-बोरीवली) या दोन्ही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माहिती देनाना परिवहन विभागाचे प्र.सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी मुंबईच्या सर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प हा रु. 568 कोटींचा असून लोकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले.
प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या प्रकल्पासाठी 75% जमीन संपादित झाली असून उर्वरित जमीनीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे भाटिया यांनी सांगितले. कार्यान्वित व्हावेत, करुन शासनाकडे सादर करावेत. हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब केला जाणार नाही. संबंधित यंत्रणेनेही याबाबत योग्य ती तत्परता दाखवावी अशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे वाचा, कोणत्या कोणत्या ठिकाणी मुंबईत सुरु आहेत 1 लाख कोटींची कामे...