आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे गटाचा वाढला प्रभाव; फुंडकर, जानकर, खाेतांच्या रूपाने समर्थक वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परदेश दाैऱ्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शुक्रवारी मंत्रिमंडळ िवस्ताराला उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी नूतन मंत्र्यांची यादी ही पंकजा यांचे सरकारमध्ये बळ वाढविणारीच असल्याचा निष्कर्ष काढला जात अाहे. पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत हे कट्टर मुंडे समर्थक मंत्रिमंडळात आल्याने यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंकजा यांच्या भूमिकेकडे फारसे दुर्लक्ष करता येणार नसल्याचेच दिसते. मराठा समाजाचे फुंडकर व धनगर समाजाचे जानकर हे थेट कॅबिनेट मंत्री झाल्याने व वंजारी समाजाचे भक्कम पाठबळ असल्याने पंकजा मुंडे यांचा अाता भाजप व मंत्रिमंडळात अावाज बुलंद हाेईल, अशीच चिन्हे अाहेत.
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातील नेतेही प्रमुख मंत्रिपदी असल्याने मंत्रिमंडळात पुन्हा मुंडे-गडकरी गटाचा संघर्ष प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकताे. अाणि दाेन्ही गटातील भांडणाचा लाभ घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र आपले नेतृत्व अधिक मजबूत करण्याची रणनीती अवलंबतील, अशीही राजकीय क्षेत्रात चर्चा अाहे.

जानकर हे पंकजा यांना बहीण मानतात. राष्ट्रीय समाज पक्षाची सारी ताकद त्यांच्या मागे उभी करण्यासाठी जानकर हे एका पायावर तयार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया खिळखिळा करण्यात जसा जानकरांचा वाटा अाहे तसाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदा खाेत यांचा. खाेत व जानकरांना मंत्री केल्यामुळे पंकजांना अाता राज्यात भक्कम साथ मिळण्याची अाशा अाहे.

संघ स्वयंसेवक असलेले फुंडकर हे तीनवेळा खासदार, दोनवेळा िवधानसभेतून आमदार तसेच २००२ पासून सलग तीनदा िवधान परिषदेत आमदार म्हणून काम पाहत आहेत. ते िवधान परिषदेत विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. सामाजिक कामांचा तसेच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले फुंडकर यांचे गाेपीनाथ मुंडेंशी सुरुवातीपासून सख्य होते. पक्षातील बहुजनांची रेषा वाढवताना मुंडे यांनी फुंडकरांच्या ग्रामीण भागातील संबंधाचा उपयोग करून घेतला. पश्चिम िवदर्भात याचा पक्षाचा चांगला फायदा झाला. मंत्रिमंडळात पूर्वी पूर्व विदर्भाचा वरचष्मा हाेता, अाता पश्चिम विदर्भालाही स्थान देण्याबराेबरच बहुजन नेतृत्व पुढे अाणण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याने फुंडकरांच्या रूपाने अाणखी एक मुंडे समर्थक मंत्रिमंडळात अाला.

गडकरी गटही बलवान
केंद्रीय मंत्री व भाजपचे हेविवेट नेते नितीन गडकरी यांच्या समर्थकांना विस्तारात स्थान िमळाले आहे. यात सुभाष देशमुख, संभाजी िनलंगेकर, मदन येरावार, रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी सुभाष देशमुख यांचा अपवाद वगळता िनलंगेकर, येरावार, चव्हाण यांनी फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध िनर्माण केले आहेत. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, डाॅ. रणजित पाटील हे कट्टर गडकरी समर्थक आधीच्या मंत्रिमंडळात असल्याने या संख्येत आता वाढ झाली आहे.
आहे मनोहर तरी…
गाेपीनाथ मंुडे यांची पुण्याई मागे असली तरी पंकजा यांनाही राजकारणात अजून खूप िशकण्यासारखे असल्याचे पक्षातच बोलले जाते. मुख्य म्हणजे मुंडे पूर्वीच्या गटाला जोडून ठेेवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागणार आहे. िवनायक मेटे व पाशा पटेल हे मुंडे समर्थक आज पंकजांपासून दूर गेले आहेत. यामुळे ‘आहे मनोहर तरी...’ असेच म्हणावे लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...