आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munde\'s Work Trouble Him, Nationalist Leader Nawab Malik

गोपीनाथ मुंडे स्वत:च्या कर्माने गोत्यात, राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्यामागे लागलेल्या निवडणूक खर्चाच्या प्रकरणामागे राष्‍ट्रवादी काँग्रेस असल्याचा भाजपचा आरोप निराधार आहे. मुंडे स्वत:हून खड्ड्यात पडले असून याप्रकरणी भाजप पराचा कावळा करत असल्याची टीका राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडलेल्या मुंबईतील कार्यक्रमात मुंडे यांनी लोकसभेसाठी आठ कोटी खर्च केल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राष्‍ट्रवादीने मुंडे यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती.

मुंडे यांना निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली होती. त्यांच्या मागे निवडणूक आयोगाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ राष्‍ट्रवादीने लावले. त्यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याची दखल घेत मलिक म्हणाले, मुंडे यांना आपण सहा वर्षांसाठी अपात्र होऊ अशी भीती वाटू लागली आहे. त्यांच्या पाठीशी पक्ष असला तरी त्यांची चौकशी अटळ आहे. या प्रकरणात मुंडे यांचा ‘राघवजी’ झाल्याचे दिसून येईल.