आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सर्व कामांचे यापुढे खासगी संस्थांकडून लेखापरीक्षण करण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी नुकतेच दिले आहेत. त्यासाठी संबंधित प्रकल्पाच्या सुमारे 2 टक्के रक्कम थर्ड पार्टी ऑडिटसाठी खर्च करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने तयार केलेल्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वादळी चर्चा झाली होती. त्यावेळी मुंबईतील रस्त्याच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेला दिले होते. महापलिकेच्या वतीने निविदा काढून कामे ठेकेदारांना दिली जातात. एकाचवेळी पालिकेच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू असतात. या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपुरी पडते. त्यामुळे ठेकेदार करत असलेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट राहतो आहे. म्हणूनच यापुढे सर्वच कामांचे ऑडीट थर्ड पार्टीकडून करण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.