आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Demolish Ramp Outside Shah Rukh Khan\'s Bungalow Mannat

शाहरुखही नमला मनपापुढे, अखेर \'मन्नत\' समोरील अवैध रॅम्प तोडण्यास सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील 'मन्नत' बंगल्याबाहेरील सिमेंटचा अवैध रॅम्प तोडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी दिलेल्या तक्रार पत्राची मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी रॅम्प तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर आज (शनिवारी) अंमलबजावणी होत आहे.
बातम्यांनुसार, शुक्रवारी रात्री (13 फेब्रवारी) रॅम्प तोडण्याच्या कारवाईस सुरुवात केली. रॅम्पवर केली जाणारी कारवाई पाहून स्थानिक लोकांनी उत्साह साजरा केला. त्यांनी शाहरुखच्या 'मन्नत' बाहेर मिठाई वाटून आनंद साजरा केला. रॅम्प तोडण्याची ही कारवाई पोलिस संरक्षणे अंतर्गत करण्यात आली.
मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील रॅम्प हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने शाहरुखला सात दिवसांत नोटिस दिली होती.
शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनला पार्क करता यावे यामुळे एक महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे होते. त्यामुळे या लोकांना माउंट मॅरी चर्चजवळून जावे लागत होते. वांद्र्यात प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या यात्रेमुळे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र, हा रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास होत होता.
स्थानिक रहिवाशांनी या रॅम्पला हटविण्याची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून करीत होते. एका स्वयंसेवी (एनजीओ) संस्थेनेही याबाबत आवाज उठवला होता. मात्र, यश मिळाले नव्हते. मात्र, मागील आठवड्यात काही स्थानिक नागरिकांनी या भागातील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
अखेर खासदार पूनम महाजन यांनी आयुक्तांना पत्र लिहून सामान्यांच्या अतिक्रमणावर जी कारवाई केली जाते, तशीच कारवाई सेलिब्रेटींच्या अतिक्रमणावर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा रॅमप लवकरात-लवकर तोडण्यात यावा अशी मागणीदेखील पूनम महाजन यांनी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटेंनी यांनी रॅम्प तोडण्याचे आदेश दिले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कारवाई करतानाची छायाचित्रे...