आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, नाशिकचे महापौरपद खुल्या गटासाठी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण महिलांना दिल्याने बुधवारी राज्यातील सहा महापालिकांच्या महापौरपदासाठी सोडत काढण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंत्रालयामध्ये ही सोडत काढली. त्यानुसार नाशिकमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असून भिवंडी व धुळे येथे खुल्या गटातील महिलांसाठी राखीव राहील. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ओबीसी, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये ओबीसी महिला यांच्यासाठी हे पद राखीव असेल. मुंबईचे महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने या वेळी खुल्या सर्वसाधारण गटासाठीच्या आरक्षणात बदल होणार नाही. महिलांच्या आरक्षणामध्ये 30 टक्क्यांहून 50 टक्के अशी वाढ केल्याने महापौर पदांसाठीचे आरक्षण पुन्हा काढण्यात आले. मात्र मुंबई, उल्हासनगर, नागपूर आणि नगर महापालिकांचे महापौर हे महिलांसाठी राखीव होते. आता ही पदे खुल्या गटासाठी आरक्षित असून त्यात बदल झालेला नाही.