आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या मतदानाची वेळ एक तासाने वाढवली; परभणी, लातूर, चंद्रपुरात 19 एप्रिल रोजी मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परभणी, लातूर, चंद्रपूर महापालिका निवडणुकांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार असून तेथील मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या शहरात आता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान हाेईल.
 
शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जारी केली. येत्या २१ तारखेला येथे मतमोजणी होणार आहे.  सांगली प्रभाग २२ ब, जळगाव प्रभाग २४ अ आणि कल्याण - डोंबिवली मनपरतिू प्रभाग ४६ च्या रिक्त पदांसाठीही १९ एप्रिल रोजी मतदान होईल. धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या, तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...